मोठ्या झाडांच्या संरक्षक जाळ्या तीन महीन्यापासून काढण्याची मागणी करुन ही जाणीव पुर्वक दुर्लक्ष
शबनम न्युज | पिंपरी
नवी सांगवी ,पिंपळे गुरव परिसरात अनेक विकास कामे चालू आहेत ,शहरात काँक्रिटीकरण वाढत आहे. शेतकऱ्याच्या जमीनी नष्ट होत आहेत. सगळीकडेच वृक्ष लागवडी पेक्षा वृक्षतोडीचे प्रमाण वाढत आहे, पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढिची ऑक्सिजनची सोय म्हणून वृक्षारोपण केले, रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला पण आणि वृक्षांना संरक्षण देण्यासाठी लोखंडी गोलाकार जाळ्या 10 वर्षापूर्वी लावल्या आहेत. परंतु आता ही झाडे खूप मोठी झाली आहेत आणि झाडाच्या बूंद्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत ,काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत,आता मोठ्या झाडांना अशा संरक्षक जाळ्या ची आवश्यकता नाही ,यामुळे झाडांची वाढ खुंटलेली आहे, झाडाच्या बुंद्याला इजा झाल्या आहेत,असे काही झाडे फेमस चौकाच्या जवळ, गणपती मंदिराच्या समोर आहेत व इतर ठिकाणचे अशा प्रकारची झाडे पालिकेने शोधून मोठ्या गोलाकार जाळया काढाव्यात म्हणजे झाडाची वाढ होऊन झाडे मोकळा श्वास घेतील अशा प्रकारची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी उद्यान प्र.अधिक्षक गोरखनाथ गोसावी यांच्याकडे तीन महिन्यांत पासून अनेकदा प्रत्यक्ष भेटून व दोनदा निवेदन देऊन केली .
भेटल्यावर फक्त जाळी काडू म्हणून सांगतात.अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्या ही प्रसिद्ध झाल्या पण उद्यान विभागची यावरून काम करण्याची किती तत्परता आहे यावरून दिसुन येते. पण आजून किती दिवस लागतील हेही सांगत नाही .”सरकारी काम सहा महीने थांब,ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते जर या पंधरा दिवसांत त्यांनी संरक्षक जाळ्या काढल्या नाहीत तर आम्ही सर्व कार्यकर्ते पुष्पगुच्छ ऊद्यानासमोर उपोषण करु असा इशारा दुसऱ्यांदा निवेदन देताना जोगदंड यांनी दिला.
या निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड ,विकास शहाणे, मीनाताई करांजवणे ,संगीता जोगदंड,गजानन धाराशिवकर ,मुरलीधर दळवी, अँड सचिन काळे,यांच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की संस्थाध्यक्ष विकास कुचेकर यांनी उद्यान विभाग झाडाची माहिती मागवली तर ३ लाख ६७ हजार भरायला सांगतात यावरुनच माहिती लपवतात यावरून दिसून येत आहे, ती झाडे वाचविण्यास दुर्लक्ष करीत आहेत.