शबनम न्युज | पुणे
स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणासाठी भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारांविषयी तयार करण्यात आलेल्या ‘ राईट टू क्लीन एन्व्हायर्नमेंट ‘ या माहितीपटाचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले आहे. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, नवी दिल्ली, यांनी आयोजित केलेल्या शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन मध्ये या फिल्मचं सादरीकरण झालं होतं. पुण्यातील निर्माते, दिग्दर्शक रोटेरियन डॉक्टर विद्यानंद दामले यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
पर्यावरण स्वच्छ राखण्यासंबंधि न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांवरही या माहितीपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. जागरूक नागरिक बनून स्वच्छ पर्यावरणाचा हक्क अबाधित ठेवण्याविषयी हा माहितीपट मार्गदर्शन करतो. प्रत्येक सुजाण नागरिकाने आपल्या हक्काची माहिती घेऊन पर्यावरण सुधारण्यास मदत करावी हा या फिल्म तयार करण्यास मागचा प्रमुख उद्देश आहे. नव्यानेच सुरू झालेल्या वसुंधरा वाहिनीवर हा माहितीपट प्रसारित झाला आहे.
यात पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक दत्ता चितळे, पर्यावरण तज्ञ सुरेश कर्वे यांचा सहभाग आहे. पटकथा व निवेदन बागेश्री देव यांचं आहे.विद्यानंद, प्रमोद पाठक यांनी चित्रीकरण केले आहे. निर्मिती सहाय्यक म्हणून मिलिंद पाटील यांनी काम केलं आहे,ध्वनीमुद्रण, संकलन राजेश देशमुख यांचे आहे.गौरी शिकारपूर, एन्व्हायरमेंट डायरेक्टर, रोटरी क्लब ऑफ पुणे, डिस्ट्रिक्ट ३१३१, राजीव पंडित, डायरेक्टर जिविधा, डॉ.विनिता आपटे,(संस्थापक,तेर पॉलिसी सेंटर ) अपूर्वा बांदल, क्युरेटर, पीसीएमसी यांनी या फिल्मचं, वसुंधरा युट्युब वाहिनीचं मनापासून स्वागत केलं आहे.