शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मुलांसाठी ॲानलाईन फोटो व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऋत्विक धनवट यांच्या पुढाकारातून आयोजिलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण महात्मा गांधी भवन मुंबई येथे झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसचिव व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लवारू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण झाले.
या सोहळ्यास महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी मितेंद्र सिंग व सहप्रभारी प्रदीप सिंधव, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, सरचिटणीस व पुणे शहर प्रभारी विजयसिंह चौधरी, पुणे युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहूल शिरसाट उपस्थित होते. युवा पिढीला महाराष्ट्र राज्याची निर्मिती व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महत्व कळावे, या हेतूने स्पर्धेचे ऋत्विक धनवट यांनी आयोजन केले होते.