शबनम न्युज | चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय आतापर्यंत चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ, क्वीनटाऊन शेजारी चिंचवड येथे कार्यरत होते. मात्र, आता सदर कार्यालय पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील एल्प्रो मॉल च्या पाठीमागील बाजूस स्थलांतरित झाले आहे.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत एल्प्रो मॉलच्या पाठीमागील बाजूस महाकाली मंदिराजवळ उभारण्यात आली असल्याने आता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे संपुर्ण कामकाज येथून पाहिले जाणार आहे. येत्या २४ जुलैला म्हणजे सोमवारी होणारी जनसंवाद सभा याच नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती ब क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली.
Advertisement