शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव, आळंदी जि. पुणे. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “मतदार नोंदणी अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त करून मतदार नोंदणीचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. राजेश अंकुश आगळे – सहाय्यक आयुक्त मतदान नोंदणी अधिकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघ यांनी मतदान नोंदणी करण्याची आवश्यकता स्पष्ट करून निवडणुकीच्या काळात मतदाराची भूमिका कशी महत्त्वाची असते या संदर्भात मत व्यक्त केले. आपल्या एका मतामुळे योग्य -अयोग्य उमेदवाराची निवड कशी होते या संदर्भात मत व्यक्त करून महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. मा.श्री. राहुल दिघे यांनी मतदार नोंदणी करण्याची प्रक्रिया सविस्तर सांगून त्यासाठी लागणाऱ्या वेबसाईट बद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा हेतू लक्षात घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. भारत हे राष्ट्र जगातील सर्वात मोठे लोकशाही प्रधान राष्ट्र असून भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी मतदानाचा मूलभूत अधिकार कसा महत्त्वाचा आहे याबाबत विवेचन करून प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य असून त्याचे पालन प्रत्येक नागरिकांनी करण्याची आवश्यकता विशद केली.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे,खजिनदार- मा.श्री. मयुर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.दिलीप बारी, प्रा.पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज, डॉ. छाया जोशी, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा.प्रीती बुऱ्हाडे, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पूजा खवले इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक आणि बी.ए.,बी.कॉम आणि बी. बी. ए. (सी.ए.) शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदान झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.