शबनम न्युज | पिंपरी
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये ‘सुमी ‘ या मराठी चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ बालकलाकार म्हणून कुमारी आकांक्षा लक्ष्मण पिंगळे हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल, राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड़ शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप पुष्पगुच्छ देऊन प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
आपल्या पिंपरी चिंचवड शहरात विशेषतः संत तुकाराम नगरची रहिवासी असल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी वर्षा जगताप यांनी व्यक्त केली.
Advertisement
Advertisement
Advertisement