युवा नेते बापू दिनकर कातळे असंख्य नागरिकांचा आधार
बापू दिनकर कातळे यांच्या वतीने होत आहेत अनेक समाजोपयोगी उपक्रम
पिंपरी चिंचवड- : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या वतीने दिनांक 22 ,23 व 24 या तीन दिवस पिंपरी चिंचवड शहरातील विकास नगर साईनगर मुकाई चौक किवळे या परिसरात भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या तीन दिवस चालणाऱ्या नेत्र तपासणी शिबिर मध्ये एकूण अकराशे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व या तपासणी शिबीर चा लाभ घेतला.
या नेत्र तपासणी शिबिरात 500 नागरिकांना मोफत चष्मे वाटप ही करण्यात आले. सदर नेत्र तपासणी शिबिरामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
युवा नेते बापू दिनकर कातळे हे नेहमीच असे सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांनी आपल्या या परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर बापू दिनकर कातळे नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या कार्यप्रणालीचे येथील नागरिक भरभरून कौतुक करतात. बापू दिनकर कातळे यांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदतही केली जाते, या परिसरात बापू कातळे नावाचे एक वलय निर्माण झाले आहे येत्या महानगरपालिका निवडणुकीत बापू दिनकर कातळे हे आपले नेते असतील असेही असंख्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या निमित्ताने माध्यमांसमोर आल्या आहेत.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे नेत्र तपासणी शिबिर तब्बल तीन दिवस मोठ्या उत्साहात नागरिकांच्या अलोट गर्दीने संपन्न झाले हे संपन्न होत असताना बापू दिनकर कातळे यांचा प्रभाव संपूर्ण प्रभागात किती मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे हे या निमित्ताने दिसून आले.
या निमित्ताने राजेंद्र नेटके ,अंकुश तरस ,संजय कातळे, धर्मपाल तंतरपाळे, रविनाना चव्हाण,दिलीप कडलक ,अशोक गाडे, संतोष मस्के, शुभम दांगट ,प्रसाद तरस, संदीप तरस, तानाजी दांगट, उमेश मोरे, शुभम येलवार, सरफराज शेख,भाऊसाहेब धावारे , पूजा मुर्गेश, अर्चनाताई राऊत, दिपालीताई चासकर आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांचे आभार युवा नेते बापू दिनकर कातळे यांनी व्यक्त केले
या निमित्ताने या नेत्र तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या असंख्य नागरिकांचे युवा नेते बापू दिनकर कातळे यांनी आभार व्यक्त केले. व असेच समाज उपयोगी उपक्रम आपण भविष्यकाळातही राबविणार तसेच प्रभागाच्या विकास कामावर आपण जास्त मेहनत करणार असून संपूर्ण शहरात आपला प्रभाग हा स्वच्छ सुंदर व विकसित प्रभाग करणार असल्याचे सांगितले.
या नेत्र शिबिरामध्ये डॉक्टर गणेश शिंदे अजय पिसाळ, निलेश चांबरे, एचडी देसाई हॉस्पिटल, सुनील वानखडे हॉस्पिटल विकास नगर ,किवळे या डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय संस्थांनी सहकार्य केले.