राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस रमजान सय्यद यांच्या हस्ते वाटप
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्य चे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमीत्ताने व पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ३८ वाकड काळाखडक भागातील आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस रमजान सय्यद यांच्या हस्ते वाटप स्मार्ट कार्ड चे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस रमजान सय्यद तसेच युवा उद्योजक अविनाश वाकडकर, बाळासाहेब वाकडकर, गोविंद जाधव यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी अनेक लाभार्थी विशाल वाकडकर यांचे कौतुक करत होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सरचिटणीस रमजान सय्यद यांनी देखील विशाल वाकडकर यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना रमजान सय्यद म्हणाले, विशाल वाकडकर यांच्यामुळेच आज नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळाले. विशाल वाकडकर यांनी पक्ष वाढीसाठी रात्र दिवस मेहनत घेतली आहे. पक्ष वाढीसाठी त्यांचा फार मोठा वाटा आहे,अशीच त्यानी गोरगरिबांना देखील वेळोवेळी मदत करावी, असे रमजान सय्यद म्हणाले.