शबनम न्युज | पिंपरी
क्रांती दिनानिमित्त पिंपळे गुरव येथील गुलमोहोर कॉलनी ते काशिद पार्क दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा आमदार लक्ष्मण जगताप व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
या पदयात्रेत माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी नगरसेविका शोभाताई आदीयाल, माजी नगरसेविका वैशालीताई जवळकर, माजी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, माजी स्विकृत नगरसेवक महेश जगताप, राहुल जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, संजय जगताप, नवनाथ जांभूळकर, रमेश काशिद, हरिभाऊ पाटील, विलास चोपडे, दिपक काशिद, अजय दुधभाते, अनिस पठाण, लक्ष्मण पालांडे, श्रीकृष्ण फिरके, कृष्णाजी खडसे, लक्ष्मण पाटील, सुभाष पालांडे, गणेश जगताप, आशिष जाधव, मोहन चौधरी, नवनाथ बिडे, राजाभाऊ लोखंडे, रोहित शिंदे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.
शालेय विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांचे वेश परिधान केले होते. तसेच देशभक्तीपर गाण्यांनी परिसर दणाणून सोडला.