शबनम न्यूज , पिंपरी चिंचवड, प्रतिनिधि :
पिंपरी चिंचवड शहरातील श्री प्रशांत दादा सपकाळ स्पोर्ट्स फाउंडेशन वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पिंपरी चिंचवड शहरातील वाळके अकॅडमी दिघी येथे येथे PCTCAअंतर्गत भव्य पिंपरी चिंचवड 40+ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रीमियर लीग चे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात 5 जून रोजी संपन्न झाले.
या प्रीमियर लीगला राष्ट्रवादीचे नियोजन समितीचे अध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले प्रशांत सपकाळ यांनी आयोजितकेलेल्या या क्रिकेट प्रीमियर लीगचा अनेक खेळाडूंना भविष्यात फायदा होईल अनेक खेळाडू तयार होतील अनेक खेळाडूंचे उज्वल भविष्य या प्रीमियर लीगच्या निमित्ताने घडणार असल्याच्या भावना अकबर भाई मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी अकबर भाई मुल्ला यांचा सन्मानही करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली