शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त शेखर बबनराव चिंचवडे (उपाध्यक्ष – भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १७ मधील चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी,बिजलीनगर, दळवीनगर या भागात घरोघरी तिरंगा फडकणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर बबनराव चिंचवडे यांच्या वतीने नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.
या परिसरात सोपान बाग कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, शिव साई कॉलनी, महादेव कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, नंदनवन कॉलनी,साठे कॉलनी, दगडोबा चौक परिसर, स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी, साईधाम कॉलनी, ओम साई कॉलनी, पंचवटी mseb भिंत परिसर या भागात घरोघरी वाटप केले.
Advertisement