शबनम न्युज | पुणे
दि.बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृतोत्सव-स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात आणि थाटामाटात साजरा केला गेला.. सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता कारण भारत देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता. सकाळी ७ ४० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पिंपळे गुरव शाखेचे अध्यक्ष, प्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी मैदानावर योग्य अंतरात उभे होते. त्यानंतर परेड घेण्यात आली ज्याचे नेतृत्व 2 विद्यार्थ्यांनी (श्रेयश सुखदेवे आणि मानसी शिंदे)यांनी केले. परेड संपल्यानंतर शाखाध्यक्ष आयु. अरविंद साळवे सर व मुख्याध्यापिका आयु. मनीषा साळवे आणि कार्यक्रमाच्या सन्माननीय प्रमुख पाहुणे आयु. उषाताई मुंडे , तृप्ती ताई जवळकर, तान्हाजी जवळकर , नितीनभाऊ सोनवणे, शशिकांत भाऊ दुधारे यांनी सकाळी ७:५० वाजता ध्वजारोहण केले. व ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयिन अधीक्षक आयु. अजित गायकवाड सर यांनी केले. नंतर माननीय प्रमुख पाहुण्यांचे छोटेसे प्रेरक भाषणही झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले.
विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम स्वागत गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन देशभक्तीपर गीते सादर केली. आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले यावर विद्यार्थ्यांनी सखोल भाषणही केले. यानंतर प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. मुलींचा पिरॅमिड, मुलींचा जिमण्याझम, मुलांचा पिरॅमिड, मुलांचे स्टंट आणि शेवटी कमळ बनवण्याचा उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केला ,त्यातील पंचशील ध्वज भारत बुद्धमय करण्याचा संदेश देत होता. यानंतर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले डोळे उघडणारे नाटक होते जे आणखी एक उत्कृष्ट हृदय जिंकणारे नाटक होते.ज्यातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रेरक संदेश देण्यात आला, नाटकानंतर स्वसंरक्षण आणि कराटे उपक्रम होते जे विद्यार्थ्यांनी नेत्रदीपकपणे सादर केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी कवायत होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी शाळेबद्दल थोडक्यात माहिती दिली, आणि करोना नंतर शाळेचे भविष्य आणि पालकांचे कर्तव्य याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. नंतर आभार प्रदर्शन आयु.बेला साठे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे सुपरवायझर आयु. आदित्य साळवे आणि आयु.प्रणिता माने मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे अध्यक्ष, प्राचार्य , कार्यालयीन अधीक्षक, आणि सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले, तर मुलांचा डान्स , डान्स कोरिओग्राफर आयु. दीपक रणदिवे सर यांनी बसवला होता तर जिमनेस्टीक, स्पोर्ट ,स्टंट, पिरॅमिड,कवायत बसवण्यासाठी आयु.एकता मुरूमकर मॅडम यांनी खूप मेहनत घेतली, तर कराटे साठी शाळेचे कराटे शिक्षक आयु.ललेश बाराथे आणि सागर सर यांनी खूप कमी वेळेत मुलांची तयारी करून घेतली होती.
या संपूर्ण कार्यक्रमाची क्षणचित्रे आयु.नितीन पराड सरांनी सुंदररित्या कॅमेरा मध्ये साठवून घेतली.. . कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना अल्पोउपहार व मिठाई (आयु.रमेश जगताप, आयु.माधव शिंदे, आयु.अक्षय शिंदे) वाटून आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी PTA कमिटी च्या (आयु.माधव शिंदे,अक्षय शिंदे,नितीन पराड,मिरा मनोहर,नाजरीन खान, चांदणी लगाडे) या सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.