शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस व शालेय व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य रमजान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मयूर भाऊ कलाटे यांच्या हस्ते शांताई येवले शिक्षण प्रसारक मंडळ अनाथ आश्रम पाचाने मावळ यांना मदतीचा हात तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र भारताच्या अमृत महोत्सवी निमित्त आबाजी भुमकर शाळा भुमकर वस्ती वाकड ध्वजारोहणास उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि भुमकर वस्ती शाळा मुले आणि भुमकर वस्ती शाळा मुली यांच्यासाठी स्वीकृत नगरसेवक मोहन दादा भूमकर आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे यांच्या हस्ते शाळेस तिरंगा व मुला मुलींसाठी पेन्सिल बॉक्स खोडरबर शॉपनर मुख्याध्यापक कोंडावळे सर मुख्याध्यापिका वैशाली शिंदे मॅडम यांच्याकडे देण्यात आली यावेळी नगरसेवक राहुल दादा कलाटे कांतीलाल शेठ भुमकर युवा नेते विक्रम शेठ वाघमारे स्वीकृत नगरसेवक मोहनदादा भुमकर संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे शिरवले सर बावधने सर रमजान सय्यद यांचे चिरंजीव समीर सय्यद हर्षद सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शांताई शिक्षण प्रसारक मंडळ अनाथ आश्रम पाचाने मावळ देणगी देण्यासाठी नगरसेवक मयूर भाऊ कलाटे यांच्या हस्ते शांताई येवले यांचे चिरंजीव बाळासाहेब येवले व रामजी बाबा विकास सोसायटी संचालक सोमनाथ घोटकुले यांच्याकडे मदत देण्यात आली.
यावेळी राहुल विनोदे दत्ता नखाते प्रमोद वाघमारे पुरुषोत्तम वाघमारे सिद्धार्थ अवतारे सोमनाथ कलाटे गणेश कलाटे किरण कलाटे अतुल भुजबळ अजहर मुलानी लक्ष्मण वाजे सुनील घोटकुले रवी मोहोळ आकाश आडगळे राजेश मेंगडे बाळासाहेब कुटे जीवन केदारी रमजान सय्यद यांचे चिरंजीव समीर सय्यद बाळासाहेब येवले आणि सोमनाथ घोटकुले हजर होते.
रमजान सय्यद यांनी अनेक वेळा कोरोनाच्या काळात गरजूंना वेळोवेळी मदत केली आहे त्यांच्या या कार्याचे नगरसेवक मयुर भाऊ कलाटे आणि मित्रपरिवाराने कौतुक केले आहे आणि यापुढे देखील ते गरजूंना मदत करत राहणार आहेत रमजान सय्यद बोलताना म्हणाले की गडकिल्ले संवर्धनासाठी मदत केली आहे शांताई येवले शिक्षण प्रसारक मंडळ अनाथ आश्रम आणि शाळेस मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या आहेत ही मदत नसून कर्तव्य आहे असेच कर्तव्य युवा पिढीने पुढे येऊन करावे असे आव्हान देखील सय्यद यांनी केले तसेच मयूर भाऊंचे आणि मित्र परिवारांचे आभार देखील मानले हा वाढदिवसाचा कार्यक्रम मयूर भाऊ कलाटे जनसंपर्क कार्यालयात वाकड येथे संपन्न झाला.