शबनम न्युज | देहू
दहीहंडी उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अंगणवाडीतील चिमुकल्यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. या चिमुकल्यांनी दहीहंडी सणानिमित्त विविध आकर्षक वेशभूषा केली होती. श्रीकृष्णाची वेशभूषा एका मुलाने केली होती तर काही मुलींना गोपींची वेशभूषा करण्यात आली होती. दहीहंडीचा हा आनंददायी चिमुकल्यांचा कार्यक्रम श्री क्षेत्र देव येथील अंगणवाडीमध्ये साजरा झाला.
Advertisement
देहू येथील अंगणवाडी क्रमांक १ मध्ये हा सण उत्साहात साजरा करण्यात अंगणवाडी सेविका शारदा बनकर व मदतनीस सुवर्णा घोडेकर तसेच अंगणवाडी देहू ४ सेविका सविता दिवेकर व मदतनिस पूजा मुसुडगे यांनी विशेष परिश्रम घेतले व सदर दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्या करून चिमुकल्यांचा हा दहीहंडी कार्यक्रम उत्साहात आनंदाने पार पडला.