शबनम न्युज | पिंपरी
रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील कचरा समस्या गंभीर, कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून कचरा समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी मा. विरोधीपक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील दैनंदिन कचरा उचलण्याचे काम में. अँन्थोनी ग्रुप प्रा.ली या कंपनी ला दिले असून, या कंपनीतर्फे रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील दैनदिन कचरा हा वेळेवर उचलला जात नाही, याबाबत त्यांना याचे उत्तर मागितल्यास त्यांच्याकडून गाडी उशिरा येणार असल्याचे असे उत्तर सांगण्यात येते, आपल्या मनपा आरोग्य विभागातर्फे तो पर्यंत कचरा सोसायटी आवारात ठेवावा अश्या सूचना केल्या जातात. मा. आयुक्त साहेब सोसायटी मधील हाउसकीपिंग कामगार हे सकाळच्या वेळेत उपलब्ध असतात, कचरा उचलणारी गाडी सायंकाळी येण्याच्या वेळेत कचरा टाकण्यास कोणी कर्मचारी भेटत नाही, अश्याने तो कचरा सोसायटी परिसरात राहतो व तो वेळेवर न उचलल्याने सोसायटी परिसरात दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे, व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून, कचऱ्याची तक्रार सोसायटीच्या वतीने आमच्याकडे केल्या असता आमच्या पाहणीच्या वेळेत संबंधित कंपनीच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या या नादुरुस्त अवस्थेत दिसून आल्या आहेत, तसेच त्यांचे वारिष्ट अधिकारी बघू करू सांगतो अशी उडवा उडवीची उत्तरे देतात, मा . आयुक्त साहेब सोसायटी व परिसरात कचरा साठून राहणे व न उचलणे हि खूप गंभीर बाब आहे तरी आपणस विनंती की रहाटणी पिंपळे सौदागर मधील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली असून या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व दैनंदिन कचरा उचलणाऱ्या कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व रहाटणी पिंपळे सौदागार मधील कचऱ्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी, असेही सदर निवेदनात नाना काटे यांनी नमूद केले आहे.