शबनम न्युज | पिंपरी
निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण काम करणाऱ्या ठेकेदाराची योग्य ती चौकशी करून कड़क कारवाई करा, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी जितेंद्र वाघ साहेब,अतिरिक्त आयुक्त (२), पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १५ मधील प्राधिकरण गंगानगर भागातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम दिनांक १५/०२/२०२० रोजी पिंपरी चिंचवड मनपा कडून सबंधित ठेकेदार यांना २४ महिन्यात पूर्ण करण्यास देण्यात आले होते म्हणजेच दिनांक १५/०२/२०२० ते १४/०२/२०२२ अखेर पर्यंत २४ महिने अशी सदर कामाची मुळ मुदत होती २४ महिने पूर्ण होऊन सुद्धा सदर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम सदर ठेकेदार यांच्या कडून पूर्ण झाले नाही, काम पूर्ण झाले नाही म्हणुन मनपाच्या वतीने सदर ठेकेदार यांना मनपा कडून दिनांक १४/०२/२०२२ ते १४/०८/२०२२ पर्यंत म्हणजेच अजुन ६ महिने सदर काम पूर्ण करण्यास मुदतवाढ मनपाने दिली होती परंतु ३० महिने होऊन सुद्धा सदर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम ठेकेदार पूर्ण करू शकले नाही स्थानिक रहिवासी नागरिक व व्यापारी वर्ग सदर कामा मुळे त्रस्त झाले आहेत. ३ वर्ष झाले या रस्त्याचे काम सुरु आहे रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत सदर कामाचे साहित्य व पाईप रस्त्यात कोठे पण ठेवण्यात आले असतात तसेच jcb ट्रेक्टर माल वाहतूक करणारे ट्रक सदर कामा च्या ठिकाणी रस्त्यावर ठेकेदार यांच्या कडून लाऊन ठेवण्यात आले असतात कढ़ी १५ दिवस काम बंद असते तर कढ़ी १ महीना भर सुद्धा काम बंद ठेवण्यात आले असते सदर काम पूर्ण करण्याची वेळ संपूण १ महिना उलटुन गेल आहे काम करण्याची मुदत संपली असताना ठेकेदार यांच्या कड़े सदर ठिकाणी काम करण्याची कोणतीही परवानगी नसताना सदर ठेकेदार कोणत्या परवानगी नुसार सदर ठिकाणी काम करत आहे याची चौकशी करावी हे काम सदर ठेकेदार ३० महिन्यात पूर्ण करू शकले नाही मनपा नियमानुसार ठेकेदार यांच्या वर योग्य ती कड़क कारवाई करावी आमच्या माहिती नुसार व स्थानिक नागरिक व व्यापारी यांच्या तक्रारारी नुसार सदर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे नागरिकांच्या तक्रारारी व मागणी नुसार या कामा ची संपूर्ण चौकशी करावी,
खालील प्रमाणे मुद्दे मांडत आहे –
महत्वाचे मुद्दे –
१)प्राधिकरण गंगानगर भागातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम मनपा ने दिलेल्या अटी व शर्ति व निकषास धरुन योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का याची संपूर्ण चौकशी करावी
२) कामाची मुळ मुदत २४ महिने होती परत ६ महिने मुदतवाढ देण्यात आली ३० महिन्यात फक्त ६० % काम करण्यात आले आहे ठेकेदार १००% काम पूर्ण करु शकले नाही सदर निविदा रद्द करण्यात यावी उरवरित काम दुसऱ्या ठेकेदारास देण्यात यावे व मनपा नियम नुसार सदर ठेकेदार यांच्या वर कड़क कारवाई करावी
३) मनपा अटी व नियमानुसार ठेकेदार यांनी POC JOINT साठी चांगल्या दर्जाचे STEEL PIPE चा वापर केलेला नाही
४) सदर ठेकेदाराने कॉन्क्रीट JOINT मधे DOWEL BAR चा वापर केलेला नाही
५) मनपा ने दिलेल्या डिजाईन नुसार फुटपाथ वर टाईल्स पेवर ब्लॉक बसवन्यास संगितले असुन ठेकेदार यांनी तेथे पैसे वाचवन्या साठी साधे पेवर ब्लॉक बसवले आहेत व फुटपाथ किमान ५ ते ७ फुटाचा असावा पैसे वाचवन्या साठी सदर ठिकाणी २ ते ३ फुटाचे करण्यात आले आहेत ते ही कॉन्क्रीट च्या लेवल नुसार नाहीत वर खाली बसन्यात आले आहेत
६)मनपा अटी व नियमानुसार POC कॉन्क्रीटकरण हे एम .४० ग्रेड चा वापरण्यात यावे असे दिले असुन तेथे निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रीटकरण वापरण्यात आले आहे
७) POC ची जाड़ी २५० ते २७० एम एम तेथे दिसून येत आहे
८) सदर कॉन्क्रीटकरण खाली स्ट्रोम वॉटर पाईप लाईनचे काही ठिकाणी चेंबर बुजावन्यात आले आहेत
९) मनपा अटी व नियमानुसार कॉन्क्रीटकरण मधे STEEL PIPE चा वापर करण्यात आलेला नाही
१०) मनपा अटी व नियमानुसार कॉन्क्रीट करण्यात आधी किती खाली रस्ता खोदुने त्या मधे मुरुम व खड़ी माती रचुन मजबूत करुण घेणे मग त्यावर सिमेंट कॉन्क्रीट करणे असे नियमानुसार सांगण्यात आले आहे त्या पद्धती ने करण्यात आले नाही
आम्ही मांडलेले मुद्दे व तक्रारारी ची सखोल चौकशी करुण सदर ठेकेदार यांच्या वर कड़क कारवाई करुण मनपा नियमानुसार दंड करण्यात यावा व सदर ठेकेदार यांच्या कामाची निविदा रद्द करुण काम दुसऱ्या ठेकेदारास देण्यात यावे सदर काम ३० महिन्यात पूर्ण झाले नाही परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे नागरिकांनची गैर सोया झाली आहे नागरिकांच्या पैशाच गैर वापर होत आहे ठेकेदार व मनपा कडून कर दात्या नागरिकांची फसवणूक होत आहे सदर विषयाची संपूर्ण चौकशी करुण लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.