शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
आदर्श शिक्षण संस्थेत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत प्रसिद्ध ग्रामीण कथा लेखक श्री बबन पोतदार ,श्री भरत शिरसे आणि श्री देवकर सर उपस्थित होते .
मागील गेल्या दोन वर्षात कोरोनाने पूर्ण जग थांबले होते.शाळा ऑनलाईन असल्याने मुलांचे लेखन आणि वाचन पूर्णतः थांबले होते.मुलांना पुन्हा एकदा शिक्षण प्रवाहात आणून त्यांच्यावर लेखन आणि वाचन संस्कार घडावेत म्हणून 75 वर्षिय बबन पोतदार आणि त्यांचे सहकारी सेवानिवृत्त झाले असूनही परिसरातील अनेक शाळांमधून जाऊन अंत्यत स्तुत्य असा उपक्रम राबवत आहेत.
आदर्श शिक्षण संस्थेत त्यांनी कथाकथन चे 47 वें पुष्प गुंफले.मुलांच्या भावविश्वात ले विविध गमतीदार किस्से सांगून तब्बल 3 तास मुलांना एकच जागी हसत खेळत खिळवून ठेवले. विद्यालयाची ग्रंथसंपदा वाढावी म्हणून संस्थेच्या ग्रंथालयास दहा पुस्तकांचा संच ही भेट दिला.
जीवनातील विविध क्षेत्रे ज्ञानाची कवाडे खुली करण्यास वाचनाचीच मदत होते. बालकांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची गरज असते तदवत भावनिक मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी उत्तम वाचन संस्काराची गरज असते असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. कविता कशी करावी कथाकथन कसे असावे याचे उत्तम सादरीकरण उपस्थित सर्व मान्यवरांनी केले
याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांनी पुस्तके देऊन गेला आणि वाचाल तर वाचाल असा संदेश या कृतीतून दिला.
शाळाप्रमुख प्रियांका प्रवीण बारसे यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थित मान्यवरांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे व उप मुख्याध्यापिका चित्रा औटी यांनी केले तर सूत्रसंचालन रफिक तांबोळी यांनी केले.