शबनम न्युज | पुणे
“एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे आहे. शिक्षकांनी अध्यापनाला आधुनिकता, तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिली, तर अध्यापन आणखी प्रभावी होईल. नवतंत्रज्ञान समजून घेत आपल्या कार्याचे मूल्यमापन करणेही गरजेचे आहे,” असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिला.
येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये आयोजित दोन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उद्घाटन डॉ. चासकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी डॉ. विजयकुमार जत्थी, केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजित औटी, ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. निलेश उके आदी उपस्थित होते.
कल्याण जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे. त्यातून देशाचा विकास आणि उज्ज्वल भविष्य घडणार आहे. प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवावे.”
प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकारातून ‘कोर्स आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ अंतर्गत ही कार्यशाळा आयोजिली होती. या कार्यशाळेत एकूण २०० प्राध्यापकांनी व ५० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. विजयकुमार जत्धी यांनी परिणामाधारित शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. समीर कल्ला यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. अभिजित औटी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रा. उजमा शेख यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. जयश्री सत्रे (विभागप्रमुख), प्रा. महेंद हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. शुभांगी हंडोरे (विभागप्रमुख), डॉ. गीतिका नारंग (विभागप्रमुख), प्रा. प्रतिक आकरते (विभागप्रमुख), प्रा. वैभव शेलार (विभागप्रमुख), प्रा. गजानन आरसलवाड (विभागप्रमुख), प्रा. विष्णु घागरे, प्रा. मीना काझी, पा. प्राजक्ता जमाले, प्रा. स्वानंद कुलकर्णी, प्रा. जितेश धुळे, प्रशांत रेणुसे, सिध्दार्थ खंडागळे, निलेश वाबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.