शबनम न्युज | पुणे
सिफी फायनान्सच्या वतीने ब्लॉकचैन व क्रिप्टोकरन्सी या विषयावर कार्यशाळा व ऑप्टिमस उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता एसव्हीसी ऑडिटोरियम, सिम्बायोसिस महाविद्यालय, विमाननगर, पुणे येथे होणार असून, या कार्यशाळेचे उद्घाटन इमरटेक इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक गौरव सोमवंशी यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी उच्च न्यायालयातील वकील बिजेंदर शर्मा, ब्लॉकचेन तज्ज्ञ अभिजित नागवडे, सिफी फायनान्सचे नवनाथ आवताडे आदी उपस्थित राहणार आहेत. ब्लॉकचैन तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आणि ‘साखळीचे स्वातंत्र्य’ या पुस्तकाचे लेखक गौरव सोमवंशी ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी, क्रिप्टोकरन्सी, मेटावर्स आणि एनएफटी यामधील नाविन्यपूर्ण आणि सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा घेणार आहेत.
Advertisement