शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी वतीने भोसरी विधानसभाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे ,महिला निरीक्षक शितल हगवणे, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा प्रा. कविताआल्हाट, मा.महापौर नगरसेविका मंगला कदम,पुणे जिल्हा निरीक्षक लोचन शिवले, वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला समन्वयक सुप्रिया सोळणपुरे, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, गीता ताई मंचरकर, मा. नगरसेवक नारायणजी बहिरवडे,दत्तात्रय जगताप, काशिनाथ जगताप, युवराज पवार आदी मान्यवर व विधानसभेतील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या बैठकीचे आयोजन भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती ताई तापकीर व कार्याध्यक्ष ज्योती ताई गोफने यांनी केले होते. या बैठकीचा उद्देश म्हणजे महिलांना संघटनेत काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, प्रभागात येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर काम कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. पक्ष बांधणी , सभासद नोंदणी हे घरोघरी जाऊन करण्यात यावे, महिलांनी राजकारणात समतोल कसा राखावा प्रामाणिक काम करून कसे पुढे जावे याचे उत्तम मार्गदर्शन मा.महापौर मंगलाताई कदम, विभागीय अध्यक्ष वैशालीताई नागवडे, शहर अध्यक्ष कविता ताई आल्हाट यांनी केले पिंपरी चिंचवड शहराचा विकास अजित दादा पवार यांनी कोणती दूरदृष्टी ठेवून केलाय हे उत्तम उदाहरण त्यानी दिलेत.महिलांना आरक्षण पवार साहेबांनी दिले त्याचे फायदा करून कसे नेतृत्व करावे असेही त्यांनी सांगितले या सर्वांच्या मार्गदर्शनाला महिलांनी अतिशय छान प्रतिसाद दिला.