शबनम न्युज | पिंपरी
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महाराष्ट्रभर आपला विस्तार करीत आहे. विविध उपक्रमांचे आयोजन करणे हीच या संस्थेची खरी ओळख. हीच आपली ओळख जपत भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या सामाजिक कार्यात भर टाकली आहे. मंचाच्या वतीने ग्रामीण वाचनालय उभारण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील , मोहोळ तालुक्या मधील चिखली या गावी प्रथम वाचनालय सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आर्थिक व पुस्तके देऊन सहकार्य केले आहे. तसेच पुण्यातील संपदा फिरमे व त्यांच्या कुटुंबांनी या ग्रामीण वाचनालयास स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञान, दिवाळी अंक असे विविध पुस्तके भेट दिली. तसेच ग्रामीण वाचनालय सुरू करण्यासाठी समीर बाळासाहेब गवळी, विजय शिंदे, प्रवीण जवंजाळ, बंडगर व तसेच मंचाचे अध्यक्ष विशाल नामदेव सिरसट व उपाध्यक्ष विजय विष्णू जायभाये यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण वाचनालय उभे केले. तसेच प्रत्येक गावात एक वाचनालय उभे करण्याचे ठरवले आहे. सर्वांना पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. असे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच्या व्दारे सांगण्यात आले आहे.