शबनम न्युज | आळंदी
भारत सरकार युवा व खेल मंत्रालय, क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय संचालनालय भारत सरकार, राज्य संपर्क अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना मुंबई यांच्या निर्देशांनुसार आळंदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना या विभागा अंतर्गत श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि आळंदी नगरपरिषद यांचे वतीने प्लास्टिक कचरा संकलन दिन साजरा करण्यात आला.
या उपक्रमात महाविद्यालय परिसर आणि आळंदी परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या धरती वर प्लास्टिक कचरा गोळा करीत प्लास्टिक कचरा यामुळे होणारे दुष्परिणाम यावर आधारित जनजागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आळंदी नगरपरिषद कर्मचारी, अधिकारी, आळंदी जनहित फाउंडेशन आदींनी सहभाग घेतला.
यावेळी युवक तरुणांना प्लस्टिक चे दुष्परिणाम यावर श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.कैलास अस्तरकर, प्रा.संजीव कांबळे, डॉ.रणजीत कदम, प्रा. परमेश्वर भताशे, प्रा.दिलीप बारी, आळंदी स्वच्छता अभियानचे समन्वयक अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, आळंदी नगरपरिषद मुकादम मालन पाटोळे, नगरपरिषद कर्मचारी आदी उपस्थितीत होते. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे मार्गदशनात आळंदी नगरपरिषद मुकादम मालन पाटोळे यांचे कडे संकलन करण्यात आलेले प्लास्टिक व कचरा सुपूर्द करण्यात आला. आळंदी नगरपरिषद व शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे रा.से. योजना यांचे वतीने स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत आळंदीत स्वच्छता अभियान राबवित जनजागृती करीत प्लास्टिक संकलन महास्वछता अभियान उत्साहात राबविण्यात आहे. यासाठी शरदचंद्र पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.