शबनम न्युज | पुणे
पुणे शहरात मार्केटयार्ड परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी भरदिवसा घडली. तसेच गोळीबार करत आरोपींची तब्बल २८ लाखांची रोडक पळवली आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास पाच ते सहा आरोपींनी पी.एम. अंगडिया कार्यालयात जात गोळीबार केला आणि नंतर पैसे लुटले. पुणे शहरात दिवसा झालेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा आरोपी दुपारी कार्यालयवळ आले. त्यांनी नंतर पिस्टल दाखवून कार्यालयातील व्यक्तीला बाहेर काढले. तिथे नंतर कार्यालयातील काचेवर आरोपींनी गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी पैसै घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Advertisement