शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अध्यक्षांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पि. चि शहर यश दत्ता (काका) साने यांच्या नेतृत्वाखाली आणि पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष मयुर कांबळे व कार्याध्यक्ष अबरार शेख यांच्या अध्क्षतेखालील हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कु.मकरंद शिंदे – उपाध्यक्ष पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सागर घाडगे – सचिव ,पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, रय्यान अहमदरफिक शेख- संघटक ‘ पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राहुल मोहन बोथ- अध्यक्ष,प्रतिभा कॉलेज , काळभोरनगर, हरिओम गिरी – अध्यक्ष,डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज,आकुर्डी, ओमकार मोरे – अध्यक्ष,ASM कॉलेज,पिंपरी, सुमित बालखांडे – प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज,आकुर्डी, प्रेम कान्हेरे – अध्यक्ष, डॉ.अरविंद बी.तेलंग सिनियर कॉलेज (कॅम्प) आकुर्डी यांची निवड करण्यात आली.