शबनम न्युज | पुणे
शहरातील अपघातासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरू असतानाच पुन्हा एका ट्रकची पिकअपला धडक बसून झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि ३०) रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस स्टेशन, वाहतूक नियंत्रण शाखा आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या पथकाने मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ घटनास्थळी धाव घेतली. कोल्हापूर हुन मुंबईकडे भाजीपाला वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाला भूमकर पूल येथे मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात घेण्यात आले. या सातही जणांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
Advertisement