शबनम न्युज | चिंचवड
शहरात पिंपरी नंतर आता चिंचवडचा ही उड्डाणपूर बंद करण्यात येणार आहे. पिंपरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तो पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आता महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल देखील बंद करण्यात येणार आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
महावीर चौकातून चिंचवड गावाकडे जाणारा जुना रेल्वे पूल हा कमकुवत झाला असल्याने त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यामध्ये पीएमपीएमएल बसचा देखील समावेश आहे. या मार्गावरील जड, अवजड वाहने पीएमपीएमएल बसेस महावीर चौकातून, खंडोबा माळ, भक्ती-शक्ती येथून भिजली नगर रिव्हर, व्ह्यू मार्गे इच्छित स्थळी जातील.
हा बदल आज रविवार (दि. ४) पासून करण्यात येणार आहे. अवजड वाहन चालकांनी या मार्गावरून वाहने न नेण्याची आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.