शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे कॅम्पमध्ये ख्रिसमसच्या उत्सवासाठी वाहतूक प्रतिबंध जाहीर करण्यात आले आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ख्रिसमसच्या उत्सवासाठी पुणे कॅम्प परिसरात वाहतूक वळवण्यास सांगितले आहे. ख्रिसमसच्या उत्सवानिमित्त एम जी रोड आणि इतर अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक प्रतिबंध जाहीर करण्यात आले आहे.
आज (रविवार) संध्याकाळी ७ वाजल्यापासून वाहतूक वळवण्यात येईल आणि त्यामध्ये रस्त्यांच्या व्यस्त पॅचसाठी वाहनांची वाहतूक बंद असेल, याबाबतचा आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर यांनी जारी केला आहे.
Advertisement
वाहतुकीतील बदल - वाय जंक्शन ते एम जी रोडची वाहतूक, कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौक मार्गे वळवण्यात येईल. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक थांबवून एसबीआय हाऊस, तीन तोफा चौक आणि लष्कर पोलीस स्टेशन मार्गे वळवण्यात येईल. व्होल्गा चौकाकडून मोहम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, ती ईस्ट स्ट्रीट आणि इंडिया गांधी चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून लष्कर पोलीस ठाण्यामार्गे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ताबूत स्ट्रीट चौकमार्गे वळविण्यात येणार आहे.