दापोडीतील पडीक असलेल्या जागेवर रुग्णालयाच्या कामाला सुरुवात
शबनम न्युज | दापोडी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका स्वाती माई काटे यांच्या वेळोवेळी पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. 30, दापोडीतील ऍव्हेलॉन सिटी डी.विंग, शेजारील. पुणे-मुंबई महा मार्गा जवळील. सर्वे नं.49 येथील पडीक असलेल्या जागेवर रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सदर जागेवर रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी स्वाती माई काटे यांनी केली होती, त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सदर जागेवर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
मा. नगरसेविका स्वाती माई काटे यांनी दापोडीतील वाढती लोकसंख्या पाहता आणि मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोय सुविधेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना तसेच प्रभाग अधिकारी विभाग, बीआरटी अधिकारी (स्थापत्य विभाग) यांना वेळोवेळी सदर जागेत रुग्णालय किंवा ओपीडी सुरू करण्याची रीतसर मागणी केली, त्यांच्या या मागणीला यश आले असून, आता या पडीक चार गुंठे जागेवर रुग्णालयच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.