शबनम न्युज | पुणे
कामगाराचा घटनास्थळी मृत्यू झाल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर पाषाण लिंक रोडवरील बांधकाम साइटच्या कामगारावर भिंत कोसळली त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. रोहन रामचंद्र घडे (वय. २६, रा. सुखसागर नगर, कात्रज ) असे मृत कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी रोहनचा भाऊ रोशन घडे (वय. २०) मंगळवारी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच या घटनेत आशिष बिंड हा कामगार जखमी झाला आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास रोहन घडे हे ‘माऊंट क्लोव्हर’ इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी तळमजल्यावर काम करत असताना, पाण्याच्या टाकीची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या बाबत अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.
Advertisement