शबनम न्युज | मुंबई
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूर येथे संपन्न झाले. यांनतर अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात १२ विधेयके मंजूर करण्यात आली. विधिमंडळात अनेक चर्चा तसेच सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक आरोप-प्रत्यारोप केले. विविध मुद्यांवर यावेळी चर्चा तसेच अनेक मुद्दे मांडण्यात आले. तसेच विविध निर्णय देखील विधिमंडळात घेण्यात आले आणि शुक्रवार (दि.३०) रोजी हिवाळी अधिवेशन संपन्न झाले. आता पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७ फेब्रुवारीला मुंबई येथे होणार आहे.
Advertisement