शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील साने चौक या मुख्य चौकातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा विजेचा खांब त्वरित काढून टाकावा, या मागणीसाठी या परिसरातील श्री मनोजभाऊ जरे युवा मंच याच्या वतीने युवा नेते, समाजसेवक श्री मनोजभाऊ जरे यांनी फ प्रभागाअधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, साने चौक हा रहदारीसाठी तसेच वाहतुकीसाठी मुख्य असे ठिकाण आहे. या चौकातून मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते. मोठमोठ्या वाहतुकीची साधने या परिसरातून जात असतात. मोठ्या प्रमाणात कामगार तसेच शालेय विद्यार्थी हे याच परिसरातून जात असतात, रस्त्याच्या मधोमध असलेला विजेचा खांब हा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत आहे. या विजेच्या खांबामुळे वाहतूक खोळंबते, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, तसेच कामगार वर्गांनाही मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो.
नागरिकांच्या या समस्येचे निवारण म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा विजेचा खांब हा महापालिका वतीने काढून टाकावा, हा विजेचा खांब काढून त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी व प्रभागातील नागरिकांना वाहतुकीसाठी जो अडथळा निर्माण होत आहे, अडचण निर्माण होत आहे. त्या अडचणीचे निराकरण करावे, अशी मागणी युवा नेते मनोज जरे यांनी फ प्रभाग अधिकारी यांच्याकडे केली आहे.