शबनम न्युज | नवी सांगवी
पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौकातील गांगार्डेनगर गल्ली नंबर ३ मधील लक्ष्मी कृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बंद खोलीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लागली. येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून आग लागून सर्वत्र धूर पसरत होता. यावेळी अग्निशमनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
गांगार्डे नगर गल्ली नं. ३ मधील लक्ष्मी कृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. स्थानिक मनसेचे सुरेश सकट, रिपब्लिकन पक्षाचे अश्विन खुडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी येथील वल्लभनगर अग्निशमन दलाला संपर्क करून कळविले. काही वेळातच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन शर्थीचे प्रयत्न करीत काही वेळातच आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्रिशमन दलाचे विमोचक बाळासाहेब वैद्य यांनी सांगितले. येथील इमारत विलास बबन मिसाळ यांच्या मालकीची होती. सदर या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दुसन्या मजल्यावरील किचनमधील साहित्य आदी जळून खाक झाले.