पिंपरी : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका ५७ वर्षीय व्यक्तीची ४९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेसात वाजता चोली बुद्रुक येथे घडला. सुरेश रावजी म्हसे (५७, रा. चन्होली बु.) यांनी द पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तीन मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी
यांच्या मोबाईलवर आरोपीने मेसेज पाठवून पेटीएम बँकेची केवायसी अपडेट करण्यास सांगितले. मोबाईलवर लिंक पाठवून ओपन करण्यास सांगितले. लिंकव क्लिक केल्यानंतर पेटीएम अॅप्लिकेशन ओपन झाले. त्यानंतर लगेचच आरोपीने फिर्यादी यांना बँकेचा ओटीपी शेअर करण्यास सांगितले. ओटीपी शेअर केल्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून ४९ हजार रुपये आरोपीने परस्पर काढून घेतले.
Advertisement