शबनम न्युज | पिंपरी
महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होत त्यांना सक्रीय राजकारणामध्ये भाग घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित यीन निवडणुकीमध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी वैष्णवी जाधव हिची बहुमताने निवड झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांत सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीमध्ये वैष्णवी हिने यीन निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहर भागातून सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करत विजयी होण्याचा बहुमान मिळविला.
यावेळी मा. प्रशांत सपकाळ यांनी वैष्णवी जाधव हिची निवड फक्त महाविद्यालय स्तरापर्यंत न थांबता पिंपरी चिंचवड शहर तसेच राज्यस्तरावर काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद करत या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्रिय राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून वैष्णवी वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.