शबनम न्युज | पुणे
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळातील ५७ पार्श्वगायिका ,७५ अभिनेत्री, ७५ चित्रपट आणि त्यातील निवडक ७५ गीतांचा कार्यक्रम पुण्यात १६ जानेवारी रोजी होणार आहे .पुना गेस्ट हाऊस स्नेह मंच यांच्या वतीने सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे .
१९४४ ते २०२१ या काळातील नूरजहाँ ते श्रेया घोषाल असे जादुई स्वर या निमित्ताने रसिकांच्या भेटीस येणार आहेत . पुना गेस्ट हाउस (लक्ष्मी रस्ता) येथे सोमवार ,दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आरती दीक्षित , दीपाली सप्रे, तृप्ती गुंजाळ ,ललिता जगदाळे, सचिन सोनटक्के, प्रसाद केळकर ,अमोद देव, शैलेश घावटे हे गायक सहभागी होणार आहेत. रूपाली करवा-चौधरी या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे,अशी माहिती संयोजक अभय सरपोतदार,किशोर सरपोतदार,अजित कुमठेकर यांनी दिली.