हिंजवडीत सुप्रिया सुळेंच्या साडीला आग
शबनम न्युज | पुणे
पुणे शहरातील हिंजवडी परिसरातील एका कराटे स्पर्धेच्या उद्घाटनावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. या स्पर्धेच्या भूमिपूजनाच्या वेळी सुप्रिया सुळेंच्या साडीला आग लागली. तसेच ही आग बारामतीच्या आमदारांनी हातानी विझविली. आगीवर तातडीने नियंत्रण आणल्याने या घटनेत सुप्रिया सुळेंना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, मी सुरक्षित आहे, तुम्ही काळजी करू नये, असे आवाहन सुळेंनी त्यांचे समर्थक, पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांना केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मंचावरील टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या टेबलाजवळ गेल्या असता, त्यांच्या साडीला खाली ठेवलेल्या दिव्याचा स्पर्श झाला आणि आग लागली. हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुळे आग विझवताना दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे या बारामतीच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.