शबनम न्युज | पुणे
पुणे शहरातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. सदर विधानसभा मतदारसंघात 27 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होणार आहे तर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ फेब्रुवारी तर ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल. ३१ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्व.आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विधानसभेत या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागेवर आता पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे.
Advertisement