शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज चेतन (अण्णा) पवार यांच्या “दुर्वा असोसिएट्स” या व्यवसायाच्या नूतन ऑफिस चा उद्घाटन सोहळा त्यांचे वडील तसेच भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या उद्घाटनप्रसंगी पिंपरी चिंचवड महपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते मा. नामदेवजी ढाके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवक्त्या आदरणीय रुपालीताई पाटील, माजी नगरसेवक मा. बाळासाहेबजी तरस, मुळशी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. चंद्रकांतशेठ पवार, युवा उद्योजक मा. काळूरामशेठ बारणे, पारनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. कैलासजी नवले, भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष मा. अनुपदादा मोरे, बांधकाम व्यावसायिक मा. सागरशेठ आगरवाल, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) युवक अध्यक्ष मा.कुणालशेठ ओव्हाळकर, किवळे गावचे युवानेते मा. गोरख तरस तसेच ताथवडे परिसरातील उद्योजक वसंतराव पवार, अमर सोनवणे, बाळासाहेब सपकाळ, हनुमंतशेठ पवार, बाळासाहेब पवार, तानाजी पवार, पांडूरंग शेळके, प्रकाशशेठ पवार, किरण बोरगे, श्रीकांत ढवळे आदी. मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच ताथवडे, पुनावळे आणि काळाखडक परिसरातील बांधकाम व्यावसायिक व नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.