शबनम न्युज | मुंबई
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडी सोबत युतीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. “यासंदर्भात मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू,” असे त्यांनी स्पष्ट केले. “उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून कुणाला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे,” असे अजित पवार म्हणाले.
Advertisement
पुढे ते म्हणाले, “राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती- आघाडी होते, त्यावेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ असे समजून पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात.”