शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
आत्तापर्यंत पाच लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना कर भरावा लागला नव्हता. नव्या कर रचनेनुसार ही मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अमृत काळातल्या अर्थसंकल्पातली ही सर्वात महत्त्वाची घोषणा आहे. हा कर किती असेल? तुमचा पगार, बोनस, पीएलपी आदींवर सारे अवलंबून असणार आहे. म्हणजेच आता सात लाखांच्या वर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार आहे. यामुळे यंदाची कराची घातलेली गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. यासाठी तुम्हाला येत्या आर्थिक वर्षापासून गुंतवणुकीची तयारी करावी लागणार आहे.
जुन्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे. नव्या कर रचना स्वीकारणाऱ्यांना सात लाखापर्यंत कुठलाही कर लागणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र सात लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या नव्या कर प्रणाली प्रमाणे कर लागू होणार आहेत.
काय आहे नवी कर प्रणाली?
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के.