शबनम न्यूज | पुणे
कुष्ठरोग निवारण पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित स्पर्श जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवावे. कुष्ठरोग रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण आणि जनजागृती शिबिराचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्श अभियानाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला सहायक संचालक डॉ.हुकुमचंद आबा पाटोळे, किसन भुजबळ, डॉ.वर्षा आहेर, डॉ.ए.व्ही.मोहोळ, जिल्हा पर्यवेक्षक दिपक कुकडे आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, महापालिकेने झोपडपट्टी भागात आणि कुष्ठरोगाचे रुग्ण असलेल्या परिसरात विशेष मोहिम राबवावी. या भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लक्षणे आणि उपचाराविषयी माहिती द्यावी. आतापर्यंत औषधोपचाराद्वारे बरे झालेल्यांची मोहिमेच्या निमित्ताने एकदा तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. डॉ.पोटोळे यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची माहिती दिली. जिल्ह्यात 699 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.