– गजाला सय्यद
शबनम न्यूज : औंध, पुणे (दि.०६ जानेवारी) :- रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मराठी विभाग व विद्यार्थी मंच आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महासप्ताहानिमित्त तसेच ६ जानेवारी मराठी पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्त्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या महत कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी रोजी राज्यात मराठी पत्रकारदिन साजरा केला जातो.
या कार्यक्रमाची सुरुवात अरुण खोरे (माजी संपादक लोकसत्ता) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर अश्विनी सातव-डोके (टीव्ही९), नीलम कराळे (ईटीव्ही न्यूज), बाबा तारे(दै.सकाळ), प्रकाश गायकर (दै.प्रभात), अमोल काकडे (दै. पुण्यनगरी), अभिराज भडकवाड (दै. प्रभात), रामदास दातार (दै. लोकमत), अर्जुन पसाले (मॅक न्यूज), मोहसीन शेख (दै. पुढारी) ज्ञानेश्वर भंडारे (दै. लोकमत), शबनम सय्यद (शबनम न्यूज, दै. मेट्रो सिटी वृत्तांत) या पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यानंतर सर्व पत्रकार मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोविंद वाकडे (न्यूज १८ लोकमत) यांनी भूषविले, तर अरुण खोरे (माजी संपादक लोकसत्ता), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, हे या कार्यक्रमासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रमेश रणदिवे, डॉ.रेश्मा दिवेकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. सदर सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.चंद्रकांत बोरुडे यांनी तर प्रा.सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार भोईरने या कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.तानाजी हातेकर, प्रा.मयूर माळी, रविराज काळे, सूर्यकांत सरोदे, ऋषीकेश कानवटे यांनी परिश्रम घेतले.