डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आकुर्डीत विविध उपक्रम आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ एप्रिल) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गंगानगर, आकुर्डी येथील रमाबाई महिला बचत गटाच्या वतीने दि. १३ एप्रिल रोजी रस्ते आणि गल्ली परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली.
गंगानगर, आकुर्डी येथील आदर्श मित्र मंडळ आणि रमामबाई महिला बचत गटाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेबांच्या जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने ३ ते ४ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा १३ तारखेला स्वच्छता मोहीम व लहामुलांसाठी स्पर्धा, १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आणि क्रांतिकारकांना पुष्पहार व मानवंदना, आरोग्य शिबीर आणि रसना वाटप कार्यक्रम घेण्यात येणार असून १५ एप्रिल रोजी बाबासाहेब तसेच इतर महामानवांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण, स्नेहभोजन आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक जावळे मामा यांनी सांगितले.
बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाताई जावळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये मीनाताई जावळे, विजया बनसोडे, वैशाली ओव्हाळ, सुनयना ओहळ, राजश्री बेंगळे, सुनीता शेलार, करुणा कांबळे, ज्योती मोरे, नाजनीन मेनन आणि बचत गटाच्या इतर सदस्य तसेच जावळे मामा, महेश पवार, बाळकृष्ण शेलार आदि उपस्थित होते.