शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुठे व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका उर्मिला काळभोर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिंचवड मध्ये आले असता त्यांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने माजी नगरसेवक प्रमोद कुठे व महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका उर्मिला काळभोर यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
Advertisement