शबनम न्युज | पुणे
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण 24 लाख रुपये किमतीचे दोन किलोचे चरस जप्त केले. पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पक्षाला माहिती मिळताच पप्पू अन्सारि याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झेडपी घेतली असता, त्याच्याकडून एकूण 24 लाखांचा चरस जप्त करण्यात आला. तपासा दरम्यान, पप्पू अन्सारी हा नेपाळमधून दारू आणून पुण्यातील व्यापारांना विकणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याघटनेचा अधिक तपास पुणे पोलीस करीत आहे.
Advertisement