शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे तीन हजार १५२ कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. वाहनचालकदेखील संपात सहभागी झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने महापालिकेत यावे लागले.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकत्र जमले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन, अशा टोप्या कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या आहेत. तीन हजार १५२ कर्मचारी संपावर गेले आहेत.
Advertisement