शबनम न्युज | भोसरी
किरकोळ वादानंतर माफी मागण्यासाठी गेलेल्या दूध व्यवसायिकाला तिघांनी मिळून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार (दि. 11) रोजी भोसरी येथील फुगे वस्तीमध्ये घडली.
याप्रकरणी न्यानेश्वर उर्फ सागर (वय 36, रा. भोसरी) यांनी रविवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय सतीश भोसले (वय 32, रा. भोसरी) याच्यासह अन्य दोन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Advertisement