शबनम न्यूज वृत्तसंस्था
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे ही कारवाई आज लोकसभा अध्यक्षांनी केली काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती ज्या संसदीय सदस्याला दोन वर्षाची शिक्षा झाली त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द होते या नियमाने आज लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली 2019 मध्ये प्रचारादरम्यान आपल्या भाषणात मोदी या नावावरून राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याचे विरोधात राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता काल सुरत न्यायालयाने या मध्ये राहुल गांधी यांना दोषी करार करून दोन वर्षाची शिक्षा व पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती आज केंद्रीय लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.