मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले हे गेली अनेक वर्ष दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. प्रशांत दामले यांची अनेक नाटक प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद देऊन जातात. प्रशांत दामले यांचे अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दामले यांनी आतापर्यंत अनेक नाटके सादर केली आहेत. सध्या प्रशांत आमले हे ‘नियम व अटी लागू’ नाटक रंगमंचावर साकारताना दिसत आहे. यानिमित्ताने प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नियम व अटी लागू या नाटकाचे तिकीट घेण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहे. या फोटोला प्रशांत दामले यांनी हटके कॅप्शन देत त्यांचे कौतुक केले आहे.
“कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही… आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग -महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी…” असे कॅप्शन दामलेंनी दिले आहे.
नियम व अटी लागू या नाटकाचे लेखन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी केले आहे तर याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी ने केले आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या इचलकरंजी मध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.