शबनम न्युज | मुंबई
सरकारी कंपन्यांकडून पीएम केअर मध्ये 2900 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पीएम केअर फंडासाठी एकूण देणग्यांपैकी हे प्रमाण सुमारे 59.3% आहे. विशेष म्हणजे सीएसआर ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पीएम केअर मध्ये सरकारी कंपन्यांची योगदान 2913 कोटी रुपयांनी एवढे असल्याचा दावा करण्यात आला.
कोविड संकटाच्या वेळी लोकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सरकारने मार्च 2020 मध्ये पीएम केअर फंड तयार केला होता. मात्र त्यावेळी त्यावर बरीच टीका झाली, कारण पंतप्रधान मदतनिधी देशात आधीच आहे मग पीएम केअर फंड कशासाठी? असाही सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आला होता. पण 2019-20 ते 2021-22 या काळात सरकारी कंपन्यांनी या मदतीत भरपूर पैसे दिले आहेत. पीएम केअर मध्ये सरकारी कंपन्यांचे योगदान 2913 कोटी रुपयांनी एवढे आहे. 69 कंपन्याने ज्यामध्ये सरकारचा हिस्सा आहे किंवा ज्या सरकारच्या अंतर्गत आहेत त्यांनी या निधीसाठी एकूण 2,913.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
यामध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने पीएम केअर मध्ये सर्वाधिक देणगी दिली आहे. कंपनीने एकूण 370 कोटी रुपयांची देणगी दिली. याशिवाय टॉप पाच कंपन्यांमध्ये एनटीपीसी 330 कोटी रुपये देऊन दुसऱ्या क्रमांकावर, पॉवर ग्रेड कॉर्पोरेशन 275 कोटी रुपये देऊन तिसऱ्या क्रमांकावर, इंडियन ऑइल 265 कोटी रुपये देऊन चौथ्या क्रमांकावर आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन 222.4 कोटी रुपयांचा पाचव्या क्रमांकावर आहे.